व्यापार्‍यावर तिघांचा तलवार, दांड्यानी जीवघेणा हल्‍ला

Foto
एमआयडीसी वाळूजमधील घटना
दुचाकीवर जात असलेल्या व्यापार्‍याला अडवत तलवार आणि दांड्याने हल्ला करण्यात आला ही घटना वाळूज एमआयडीसी भागातील मल्हार चौकात घडली. गंभीर जखमी व्यापार्‍यावर उपचार सुरू आहे.
किशोर विश्वनाथ बनकर वय-38 (रा.वडगाव कोल्हाटी) असे जखमीचे नाव आहे. तर नामदेव रोरे, योगेश रोरे, व नामदेवचे वडील अशा तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक मगिती अशी की, बनकर यांचा जेसीबीचा व्यवसाय आहे. आरोपी नामदेव सोबत त्यांचा जुना वाद होता. ते मल्हार चौकातून जात असताना आरोपी नामदेवने त्यांची दुचाकी अडवली व भाऊ योगेश आणि वाडीलाला बोलावून घेत तलवार व दांड्याने हल्ला केला. या मध्ये बनकर यांच्या हाताच्या चार बोटाना गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे आहे.या प्रकरणी तिघा विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक निरीक्षक घेरडे करीत आहेत.